गणेशोत्सामध्ये आवाजाची पातळी डिजिटल मोडवर दाखवा एनजीटीने गणेश मंडळाना आदेश दिले आहेत. नियमाचे पालन करण्याची जबाबदारी प्रदूषण मंडळ पोलिसांवर असणार आहे. तर डिजेसोबतचं ढोल ताशा पथकांनाही हे नियम लागू होणार आहेत.
डॉ. कल्याणी मांडगे, याचिका कर्त्या | आवाजाची पातळी आटोक्यात आणनं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री 10ला आवाज बंद केला जातो याचा अर्थ सकाळी 6 ते रात्री 10 अमर्याद आवाज असा त्याचा अर्थ नाही. त्यादरम्यान एनजीटीने आमच्या निरिक्षणाचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी निश्चित दिशा दिली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीकरच्या संख्येवर मर्यादा आलेली आहे. मांडवाच्या आणि पंडालच्या उंची इतकाच राहणार आहे. पण तरी 40 मिटरपर्यंत फक्त दोनच स्पीकर लावायचे आहेत. स्पीकरच्या भिंती उभ्या करायच्या नाहीत हे फार मोठे आणि महत्त्वाचे निर्णय आहेत. हे निर्णय जसे आगमनासाठी आहेत त्याचप्रमाणे ते विसर्जनाकरीता देखील लागू होणार आहेत.